सुविधा व दिनक्रम
प्रत्येक कुटुंबाच्या वेळापत्रकासाठी योग्य पर्याय — ६ महिने – १० वर्षे वयाच्या मुलांसाठी.
पूर्ण दिवस
साधारण सकाळी ९ – सायं. ७
नोकरी करणाऱ्या पालकांसाठी सर्वात लोकप्रिय. नाश्ता, जेवण, खाऊ, झोप, खेळ — सर्व समाविष्ट. ऑफिसला उशीर झाल्यास पिक-अपमध्ये लवचिकता.
अर्धा दिवस
सकाळ किंवा दुपार
प्लेस्कूल/शाळेच्या आधी किंवा नंतरची सोय. तुमच्या मुलाच्या शाळेच्या वेळेनुसार जुळवून घेतो.
तासाप्रमाणे
गरजेनुसार
दवाखाना, कार्यक्रम किंवा काम — काही तासांसाठी मुलांना सुरक्षित ठेवा. तुम्ही परत येईपर्यंत मूल खाऊन-पिऊन आनंदी.
रात्रीची सोय
आधी ठरवून
रात्रपाळी किंवा अडचणीच्या वेळी सायंकाळनंतरची व रात्रीची सोय उपलब्ध. वेळापत्रकासाठी कॉल करा.
माझं घरमधील एक दिवस
| वेळ | काय चालते |
|---|---|
| ९:०० – १०:०० | आगमन, खेळ व नाश्ता |
| १०:०० – ११:३० | उपक्रम — बडबडगीते, गोष्टी, चित्रकला |
| ११:३० – १२:३० | हात-पाय धुऊन घरगुती जेवण |
| १२:३० – ३:०० | शांत खोलीत झोप |
| ३:०० – ४:०० | उठल्यावर दूध व हलका खाऊ |
| ४:०० – ६:०० | खेळ |
| ६:०० – ७:०० | संध्याकाळचा खाऊ, गोष्ट व पिक-अप |
🍲 जेवण
सर्व जेवण ताजे व घरगुती — वरण-भात, खिचडी, पोळी-भाजी, उपमा, फळे व दूध. तुमच्या सूचनांप्रमाणे (ॲलर्जी, जैन जेवण, साखर नको इ.) आहार दिला जातो. हवे असल्यास घरून डबाही चालेल.
💰 फी
फी मुलाच्या वयावर व निवडलेल्या सुविधेवर अवलंबून असते. कोणतेही छुपे शुल्क नाही. सध्याच्या फीसाठी +91 97621 24010 वर कॉल करा किंवा व्हॉट्सॲप करा.
कोणती सुविधा योग्य ते ठरत नाहीये?
तुमची कामाची वेळ व मुलाचे वय सांगा — आम्ही योग्य पर्याय सुचवू. ट्रायल दिवसही उपलब्ध.